-
सोनी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) गेल्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
-
आपल्या निखळ विनोदाने अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारे हे कलाकार आता एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत.
-
निमित्त आहे, जागतिक स्तरावरील सर्वात ग्लॅमरस फॅशन इव्हेंट ‘मेट गाला २०२६’ (Met Gala 2026).
-
४ मे पासून दिमाखात सुरू झालेल्या ‘मेट गाला’ची यावर्षीची थीम ‘कॉस्च्युम आर्ट’ (Costume Art) असून, ‘फॅशन इज आर्ट’ (Fashion is Art) असा ड्रेस कोड देण्यात आला आहे.
-
याच थीमला अनुसरून सोनी मराठीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर हास्यजत्रेतील कलाकारांचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
कलाकारांचा हा हटके आणि फॅशनेबल अवतार पाहून चाहते थक्क झाले आहेत.
-
या फोटोंवर मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनीही मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. यशोमन आपटेने “Met जत्रा हास्य Gala!” अशी कमेंट करत त्याने कौतुक केले तर, सुव्रत जोशीने “भारी!!! MET गाळा,” असे म्हणत त्याने या लूकला दाद दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनी मराठी/इन्स्टाग्राम)
Numerology : विश्वासघातकी असतात ‘या’ २ मूलांकाचे लोक, यशस्वी होतात पण वाईट सवयींमुळे बिघडवतात नातेसंबंध