-
झी मराठीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील सोयराबाईंच्या भूमिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री स्नेहलता वसईकर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
-
स्नेहलताने नुकतेच तिचे काही खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केले असून तिच्या या अनोख्या लूकवर नेटकरी फिदा झाले आहेत.
-
या फोटोशूटमध्ये स्नेहलताने अतिशय सुंदर अशी तपकिरी (ब्राऊन) रंगाची साडी परिधान केली आहे.
-
साडीसोबत तिने पांढऱ्या रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान करून पारंपारिक लूकला एक मॉडर्न टच दिला आहे.
-
या लूकचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे स्नेहलताने साडीवर चक्क पांढऱ्या रंगाचे शूज (Sneakers) घातले आहेत.
-
नाकात पारंपारिक नथ आणि हातात सोनेरी बांगड्या घालून तिने भारतीय संस्कृती आणि पाश्चात्य फॅशनचा एक उत्तम मेळ साधला आहे.
-
स्नेहलताने या फोटोंना ‘A smile is an essential part of my style.’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
तिच्या या धाडसी फॅशन सेन्सचे कौतुक होत असून साडी आणि शूजचा हा हटके कॉम्बिनेशन सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: स्नेहलता वसईकर/इन्स्टाग्राम)
Government Formation News 2026 Live Updates: विजयच्या शपथविधीचं काय झालं? घराबाहेरचे मेटल डिटेक्टर काढले, समर्थक आपापल्या घरी परतले!