-
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत अभिनेता सुमीत पुसावळे प्रमुख भूमिकेत दिसत आहे.
-
सुमीतने नुकतेच आपली पत्नी मोनिका महाजन पुसावळे हिच्यासोबत नाशिकमध्ये एक खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोंमध्ये सुमीतने काळ्या रंगाचा नक्षीकाम केलेला कुर्ता परिधान केला असून तो अतिशय देखणा दिसत आहे.
-
त्याची पत्नी मोनिकाने गडद पिवळ्या रंगाचा पारंपारिक पंजाबी ड्रेस घातला असून तिचा लूक मोहक वाटत आहे.
-
या खास फोटोंना सुमीतने ‘तोरे आगे मै सर को झूकाऊ’ अशी प्रेमळ कॅप्शन दिली आहे.
-
सुमीतने याआधी ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या गाजलेल्या मालिकेमध्ये काम केले आहे.
-
नाशिकमधील ऐतिहासिक वास्तूच्या पार्श्वभूमीवर या दोघांचा पारंपारिक लूक चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
सोशल मीडियावर या जोडीच्या फोटोंवर चाहत्यांकडून सध्या लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: सुमीत पुसावळे/इन्स्टाग्राम)
Photos : प्राजक्ता गायकवाडच्या घरी सत्यनारायणाची पूजा; साडीतील पारंपरिक लूकने वेधले लक्ष