-
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर जगभरातील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.
-
२०१८ पासून सुरू असलेला हा कार्यक्रम आजही लोकप्रियतेच्या शिखरावर असून, दिग्गज कलाकारांपासून सामान्य रसिकांपर्यंत सर्वच या शोचे चाहते आहेत.
-
या कार्यक्रमातील आपल्या विनोदी टायमिंगने प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री चेतना भट (Chetana Bhat) सध्या तिच्या एका नवीन फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
-
चेतनाने नुकतेच सोशल मीडियावर आपले काही फोटो शेअर केले असून तिच्या सौंदर्याने चाहत्यांना भुरळ घातली आहे.
-
या खास फोटोशूटसाठी चेतनाने निळ्या रंगाची चंदेरी काठ असलेली साडी नेसली आहे.
-
या लूकला अधिक उठावदार करण्यासाठी चेतनाने गळ्यात सुंदर मोत्यांचा हार, कानातले आणि हातात नाजूक बांगड्या परिधान केल्या आहेत.
-
चेतनाने या फोटोंना ‘मी मज हरपून बसले गं…’ असे साजेसे कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : चेतना भट/इन्स्टाग्राम)
साध्या वेशात उभ्या राहिलेल्या ‘लेडी सिंघम’ला छेडण्यासाठी आले ४० तरुण, महिलांबाबतचं वेदनादायी वास्तव कसं आणलं समोर?