-
‘तुझ्यात जीव रंगला’फेम अभिनेता हार्दिक जोशी सध्या त्याच्या परदेश दौऱ्यामुळे चर्चेत आला आहे.
-
हार्दिक जोशी आणि अमोल नाईक हे दोघेही ‘महाराष्ट्र प्रीमियर सेलिब्रिटी लीग’साठी थायलंडला गेले होते.
-
या खास दौऱ्यादरम्यानचे काही सुंदर आणि अनपेक्षित क्षण त्यांनी सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
-
एका फोटोमध्ये हार्दिक आणि अमोल हे दोघेही मैदानावर खेळाच्या गणवेशात एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून उभे असल्याचे दिसत आहे.
-
त्यांच्या या जर्सीवर ‘TAM India’ असे नाव असून, पाठीवर त्यांचे स्वतःचे नावही ठळकपणे दिसत आहे.
-
मैदानावरील या फोटोंमध्ये दोघांच्याही चेहऱ्यावर खेळाचा उत्साह आणि एक वेगळाच आत्मविश्वास पाहायला मिळत आहे.
-
हार्दिकने क्रीम रंगाचा टी-शर्ट आणि काळी पँट घातली असून, अमोल पांढऱ्या रंगाच्या शर्टमध्ये स्टायलिश दिसत आहे.
-
या फोटोंना त्यांनी ‘Thailand diaries’ अशी समर्पक कॅप्शन देऊन, आपल्या आठवणींना उजाळा दिला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: अमोल नाईक/इन्स्टाग्राम)
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली? मुख्यमंत्र्यांसह सरकारला थेट इशारा