-
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या २०१६ मधील ऐतिहासिक यशस्वी ‘सैराट’ (Sairat Movie) चित्रपटातून घराघरांत पोहोचलेली जोडी म्हणजे रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) आणि आकाश ठोसर (Akash Thosar).
-
रिंकू व आकाश या जोडीने पुन्हा एकदा चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
निमित्त होते उद्योजिका उषा काकडे यांच्या नातवाच्या बारशाचे, जिथे या दोघांनीही हजेरी लावली होती.
-
या सोहळ्यासाठी रिंकूने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला होता, तर आकाश पांढऱ्या टी-शर्ट आणि काळ्या पॅन्टमध्ये डॅशिंग दिसत होता.
-
या भेटीचे फोटो शेअर करताना रिंकूने “आम्ही भेटलो, खूप हसलो आणि असेच काही फोटो काढले…” असे कॅप्शन दिले आहे.
-
‘सैराट’ प्रदर्शित झाला तेव्हा रिंकू अवघ्या १४-१५ वर्षांची होती, मात्र आजही या जोडीची क्रेझ तसूभरही कमी झालेली नाही, हे चाहत्यांच्या कमेंट्सवरून स्पष्ट होत आहे.
-
‘सैराट’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाने केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशाला वेड लावले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरू/इन्स्टाग्राम)
सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा; तमिळनाडू, पश्चिम बंगालमध्ये आज शपथविधी