-
स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘सहकुटुंब सहपरिवार’ (Sahkutumb Sahparivar) मधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री कोमल कुंभार (Komal Kumbhar) सध्या तिच्या एका खास फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
-
सोशल मीडियावर कोमलच्या साडीतील सौंदर्याची जोरदार चर्चा रंगली असून, चाहत्यांनी तिच्या या लूकवर पसंतीची पावती दिली आहे.
-
या फोटोशूटसाठी कोमलने राखाडी रंगाची साडी आणि त्यावर मरून रंगाचा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज परिधान केला आहे.
-
साडीला साजेसे पारंपारिक दागिने आणि केसांची सुंदर वेणी घालून कोमलने आपला लूक पूर्ण केला आहे.
-
अतिशय हलका मेकअप करत कोमलने तिचे नैसर्गिक सौंदर्य जपले आहे.
-
कोमलने केवळ ‘सहकुटुंब सहपरिवार’च नव्हे, तर ‘अबोली’ या मालिकेतूनही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
-
मागील वर्षी, २५ नोव्हेंबर २०२५ रोजी तिने अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक गोकुळ दशवंत यांच्याशी विवाहगाठ बांधली.
-
(सर्व फोटो सौजन्य : कोमल कुंभार/इन्स्टाग्राम)
Kolkata Police Unfollow Mamata Banerjee on X : प. बंगाल पोलिसांची मावळत्या सूर्याकडे पाठ, उगवत्या सूर्याला नमस्कार; मोदींना ‘फॉलो’, ममतांना केलं अनफॉलो!