-
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांनी २६ फेब्रुवारी रोजी पारंपरिक पद्धतीने विवाहगाठ बांधली होती.
-
लग्नानंतर विजयचा पहिला वाढदिवस ९ मे रोजी अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला असून सोशल मीडियावर याच्या चर्चा रंगल्या आहेत.
-
या खास प्रसंगी रश्मिकाने आपल्या लाडक्या पतीसाठी इन्स्टाग्रामवर काही सुंदर फोटो शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
रश्मिकाने शेअर केलेल्या कॅप्शनमध्ये त्यांच्या संपूर्ण दिवसाचा घटनाक्रम सविस्तरपणे सांगितला असून तिने लिहिले की, “आज माझ्या पतीचा वाढदिवस आहे आणि आमचा संपूर्ण दिवस असा व्यतीत झाला. हे सर्व मी उलट क्रमाने सांगत आहे. आता आम्ही वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्यासाठी मित्राच्या घरी निघालो आहोत, पण त्याआधी आम्ही जिममध्ये जाऊन वर्कआउट केले. त्यापूर्वी मी थोडे कार्डिओ केले आणि विजय एका मीटिंगसाठी बाहेर गेला होता. त्याआधी आम्ही घरी आलेल्या आमच्या चाहत्यांना आणि मित्र-मैत्रिणींना भेटलो, ज्यांनी विजयवर प्रेमाचा वर्षाव केला आणि मलाही खूप प्रेम मिळाले. तसेच दिवसाच्या सुरुवातीला आम्ही पप्पा आणि शिम्मू यांची भेट घेतली, जे खास विजयच्या वाढदिवसासाठी येथे आले आहेत आणि अशा प्रकारे आमचा आजचा दिवस अगदी परिपूर्ण होता. ”
-
एका फोटोमध्ये रश्मिका विजयला मिठी मारताना दिसत असून त्यांच्यातील केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावली आहे.
-
विजयच्या वाढदिवसानिमित्त रश्मिकाने त्यांच्या घरातील काही खास खाजगी क्षण फोटोंच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये रश्मिका हिरव्या रंगाच्या साडीत तर विजय फिकट गुलाबी रंगाच्या कुर्त्यामध्ये अत्यंत देखणे दिसत आहेत.
-
सोशल मीडियावर रश्मिकाची ही पोस्ट अल्पावधीतच व्हायरल झाली असून चाहत्यांनी या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: रश्मिका मंदाना/इन्स्टाग्राम)
आईशप्पथ, या पोरी म्हणजे… ‘मी छत्तीस नखरेवाली’ गाण्यावर तरुणी झाल्या बेभान; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नादखुळा पोरींनो…”