-
मराठी अभिनेत्री ऋजुता देशमुख हिने तिची सहकलाकार संयोगिता भावे व आभा वेलणकर यांच्यासोबत एका खास ‘पैठणी’ फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत.
-
लग्नानंतर होईलच प्रेम या लोकप्रिय मालिकेतील या तिन्ही अभिनेत्रींनी पारंपरिक महाराष्ट्रीयन लूकमध्ये चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
ऋजुता देशमुखने या फोटोंना ‘आम्ही तिघी’ अशी अतिशय गोड आणि छोटेखानी कॅप्शन दिली आहे.
-
या फोटोशूटमध्ये ऋजुताने केशरी रंगाची आणि हिरव्या काठाची सुंदर पैठणी परिधान केली असून, त्यावर नथ आणि दागिन्यांचा साज उठून दिसत आहे.
-
मालिकेत ‘मानिनी’ची भूमिका साकारणारी ऋजुता खऱ्या आयुष्यातही तितकीच मोहक आणि साधी दिसत असल्याचे या फोटोंवरून समजते.
-
मालिकेत ‘वसूआत्या’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संयोगिता भावे यांनी जांभळ्या रंगाच्या शाही पैठणीत आपले सौंदर्य खुलवले आहे.
-
मधुवंती ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या आभा वेलणकर यांनी आकाशी रंगाची साडी आणि त्यावर लाल रंगाचा ब्लाऊज असा आकर्षक लूक कॅरी केला आहे.
-
या तिन्ही अभिनेत्रींच्या गळ्यातील पारंपरिक दागिने आणि हातातील तोडे त्यांच्या पैठणी साडीच्या लूकला अधिकच समृद्ध बनवीत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: ऋजुता देशमुख/इन्स्टाग्राम)
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली? मुख्यमंत्र्यांसह सरकारला थेट इशारा