-
Mothers Day 2026: जगभरात आज ‘मातृदिन’ म्हणजेच मदर्स डे मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
-
आईचं प्रेम, तिचं समर्पण आणि कुटुंबासाठी तिने दिलेल्या अफाट योगदानाचा सन्मान करण्याचा हा हक्काचा दिवस.
-
दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी हा दिवस साजरा केला जातो.
-
या खास औचित्यावर लोकप्रिय कॉमेडियन भारती सिंगने (Bharti Singh) आपल्या मुलांबरोबर एक विशेष फोटोशूट केले असून, त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.
-
मदर्स डेच्या या फोटोशूटसाठी भारतीने फिकट निळ्या रंगाचा सुंदर गाऊन परिधान केला आहे.
-
या ड्रेसमध्ये भारतीचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. तिने आपल्या मुलांबरोबर अत्यंत आनंदी आणि हळवे क्षण कॅमेऱ्यात कैद केले आहेत.
-
भारतीच्या मुलांची नावे लक्ष्य (गोला) आणि यशवीर अशी आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : भारती सिंग/इन्स्टाग्राम)
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली? मुख्यमंत्र्यांसह सरकारला थेट इशारा