-
अभिनेत्री मृणाल ठाकूरने (Mrunal Thakur) आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
मृणाल लवकरच ‘है जवानी तो इश्क होना है’ (Hai Jawani Toh Ishq Hona Hai Movie) या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.
-
प्रमोशनच्या एका खास कार्यक्रमासाठी मृणालने हिरव्या रंगाची भरजरी सिल्क साडी नेसली होती.
-
या लूकवर मृणालने साजेसा नेकलेस, कानातले आणि बांगड्या असा पारंपारिक साज शृंगार केला होता.
-
मृणालच्या या लूकने सोशल मीडियावर सध्या चांगलीच पसंती मिळवली आहे.
-
डेव्हिड धवन दिग्दर्शित हा चित्रपट ५ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.
-
या चित्रपटात मृणालबरोबर अभिनेता वरुण धवन मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मृणाल ठाकूर/इन्स्टाग्राम)
“आम्ही कुणाच्या मुली वाढवत आहोत?”; IVF नंतर डीएनए रिपोर्ट समोर आला आणि जोडप्याची भीती ठरली खरी