-
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) हा कार्यक्रम गेल्या सात वर्षांपासून प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहे.
-
विषयांचे नावीन्य, अस्सल मराठी विनोद आणि विविध बोलीभाषांचा गोडवा जपल्यामुळे या कार्यक्रमाने लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच आपलंसं केलं आहे.
-
या लोकप्रिय कार्यक्रमात अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) परीक्षकाच्या भूमिकेत झळकत असते.
-
नुकतेच सईने या शोसाठी एका खास प्रिंटेड बॉडीकॉन ड्रेसमध्ये फोटोशूट केले असून तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.
-
सईने या फोटोंना “It’s Been Breezy!” असे कॅप्शन दिले असून तिचा हा स्टायलिश अंदाज चाहत्यांना विशेष भावला आहे.
-
सई केवळ फॅशनमुळेच नाही, तर तिच्या अभिनयामुळेही सध्या चर्चेत आहे.
-
काही दिवसांपूर्वीच तिची ‘मटका किंग’ (Matka King) ही बहुचर्चित वेब सीरिज ‘अॅमेझॉन प्राइम’वर प्रदर्शित झाली असून त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सई ताम्हणकर/इन्स्टाग्राम)
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली? मुख्यमंत्र्यांसह सरकारला थेट इशारा