-
‘बिग बॉस’ मराठीच्या सहाव्या पर्वात आपल्या बेधडक अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकणारी अनुश्री माने सध्या चर्चेत आली आहे.
-
अनुश्रीने नुकतेच तिचे काही ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून, चाहत्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत.
-
या फोटोशूटमध्ये अनुश्रीने अतिशय सुंदर असा फ्लोरल प्रिंट असलेला लेहेंगा परिधान केल्याचे दिसत आहे.
-
बारीक नक्षीकाम केलेला तिचा हा ड्रेस आणि त्याला साजेसा मेकअप तिच्या सौंदर्याला अधिकच खुलवत आहे.
-
हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने कानात जड झुमके आणि हातात मरून रंगाच्या बांगड्या घातल्या आहेत.
-
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत असून, अनेकांनी तिचे कौतुक केले आहे.
-
अनुश्रीने या खास फोटोंना ‘In my Chammak Challo era….’ अशी कॅप्शन देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेल्या अनुश्रीचा हा नवा अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडल्याचे दिसून येते.
-
(सर्व फोटो सौजन्य: अनुश्री माने/इन्स्टाग्राम)
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली? मुख्यमंत्र्यांसह सरकारला थेट इशारा