-
स्वानंदी सरदेसाई ही एक लोकप्रिय यूट्यूबर व गायिका असून, ती आपल्या साधेपणासाठी विशेष ओळखली जाते.
-
सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असलेली स्वानंदी या माध्यमातून चाहत्यांशी आपल्या दैनंदिन जीवनातील घडामोडी शेअर करीत असते.
-
काही दिवसांपूर्वीच स्वानंदीने विक्रांत रामदास याच्याशी विवाहगाठ बांधून आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे.
-
नुकतेच स्वानंदीने समुद्रकिनाऱ्यावरील काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून, त्यात तिचा रोमँटिक अंदाज दिसत आहे.
-
या फोटोंमध्ये तिने गडद गुलाबी रंगाची साडी परिधान केली असून, केसात माळलेला पांढरा मोगरा तिच्या सौंदर्याला अधिक खुलवत आहे.
-
२०२५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दशावतार’ चित्रपटासाठी स्वानंदीने गाणे गायले असून, तिने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
-
स्वानंदीच्या या साध्या तरीही मोहक लूकवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करीत तिला पसंती दर्शवली आहे.
-
समुद्रकिनाऱ्यावरील लाटांच्या साक्षीने काढलेले हे फोटो सध्या इंटरनेटवर खूपच व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: स्वानंदी सरदेसाई/इन्स्टाग्राम)
आईशप्पथ, या पोरी म्हणजे… ‘मी छत्तीस नखरेवाली’ गाण्यावर तरुणी झाल्या बेभान; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नादखुळा नाचलात पोरींनो …”