-
‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेतील काव्या म्हणजेच प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे.
-
ज्ञानदाचा पती हर्षद आत्माराम सिनेमॅटोग्राफर, DOP आहे.
-
ज्ञानदा-हर्षदच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. “प्रेमाची गोष्ट…” असं कॅप्शन देत ज्ञानदाने हे फोटो शेअर केले आहेत.
-
मजंठा कलरची अन् त्याला सोनेरी काठ असलेली नऊवारी साडी, डिझायनर कर्णफुलं, हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा, गळ्यात मोत्याचा हार, नाकात नथ आणि कपाळी चंद्रकोर या लूकमध्ये ज्ञानदा खूपच गोड दिसत होती.
-
ज्ञानदाच्या या मराठमोळ्या वेडिंग लूकचं सर्वत्र भरभरून कौतुक करण्यात येत आहे.
-
ज्ञानदाच्या मंगळसूत्राच्या साध्या व सुंदर अशा डिझाइनने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यामध्ये काळे मणी अन् दोन डवल्या आहेत.
-
ज्ञानदाच्या पारंपरिक मंगळसूत्राला खास मॉर्डन टच देण्यात आला आहे. अभिनेत्रीने परंपरेनुसार माहेर व सासरकडची अशी दोन मंगळसूत्र घातली आहेत.
-
ज्ञानदा हर्षदपेक्षा ७ वर्षांनी लहान आहे. या दोघांची पहिली भेट शॉर्ट फिल्मच्या शूटिंगदरम्यान झाली होती.
-
२०१९ मध्ये हर्षदने ज्ञानदाला लग्नासाठी विचारलं होतं. आता रिलेशनशिपला सहा-सात वर्षे पूर्ण झाल्यावर हे दोघंही लग्नबंधनात अडकले आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : sevenvowstories आणि ज्ञानदा रामतीर्थकर इन्स्टाग्राम )
आईशप्पथ, या पोरी म्हणजे… ‘मी छत्तीस नखरेवाली’ गाण्यावर तरुणी झाल्या बेभान; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नादखुळा नाचलात पोरींनो …”