-
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) हा कार्यक्रम सध्या घराघरांत लोकप्रिय झाला आहे.
-
दैनंदिन तणावातून सुटका मिळवून देणारी हक्काची जागा म्हणून या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.
-
केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभरातील मराठी रसिक या कार्यक्रमावर पसंतीची मोहोर उमटवत आहेत.
-
या कार्यक्रमातून आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारी अभिनेत्री वनिता खरात (Vanita Kharat) सध्या तिच्या एका खास फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
-
वनिताने नुकतेच तिचे काही ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोशूटसाठी वनिताने काळ्या रंगाचा स्टायलिश को-ऑर्ड सेट आणि त्यावर कॉन्ट्रास्ट देणारे पांढरे जॅकेट परिधान केले आहे.
-
वनिताचा हा आत्मविश्वासपूर्ण अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : वनिता खरात/इन्स्टाग्राम)
अभिनेत्री संचिता उगलेचं सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी कनेक्शन? संचिताच्या भावाचा खळबळजनक आरोप