-
गजेंद्र अहिरे लिखित आणि दिग्दर्शित ‘शेवग्याच्या शेंगा’ (Shevgyachya Shenga Marathi Natak) या नाटकाला सध्या प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
-
मराठी अभिनेत्री नंदिता पाटकरने (Nandita Patkar) नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांत आपल्या कसदार अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
-
विशेषतः प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवरून नंदिताच्या अभिनय प्रवासाची सुरुवात झाली.
-
अभिनयाबरोबरच नंदिता सध्या तिच्या एका सुंदर फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
-
या फोटोशूटसाठी नंदिताने अबोली रंगाची सुंदर सिल्क साडी नेसली आहे.
-
या साडीवर नंदिताने मोत्यांचा हार, कानातले, हातात हिरव्या बांगड्या आणि ठसठशीत मंगळसूत्र असा पारंपरिक साज शृंगार केला आहे.
-
एप्रिल २०२६ च्या पहिल्या आठवड्यात नंदिताने प्रसिद्ध दिग्दर्शक विपुल महागावकर यांच्याशी विवाहगाठ बांधून आपल्या आयुष्याची नवी सुरुवात केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : नंदिता पाटकर/इन्स्टाग्राम)
‘सनातन धर्माचे निर्मूलन झालेच पाहिजे’; मुख्यमंत्री विजय यांच्यासमोरच उदयनिधी स्टॅलिन यांचा पुनरुच्चार