-
मराठी चित्रपटसृष्टीतील अष्टपैलू आणि लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) सध्या आपल्या कुटुंबासह सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
-
सिद्धार्थ आपली पत्नी तृप्ती अक्कलवार (Trupti Akkalwar) आणि स्वरा-इरा या दोन्ही मुलींसह मलेशिया सफरीवर गेला असून, तिथले त्याचे फोटो सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
-
मलेशिया हा दक्षिण-पूर्व आशियातील निसर्गसौंदर्य आणि समृद्ध संस्कृतीने नटलेला देश आहे.
-
सिद्धार्थने या सहलीचे खास फोटो शेअर करताना ‘Vacation Mode On… Happy Vibes’ असे कॅप्शन दिले आहे.
-
प्रसिद्ध ‘ट्विन टॉवर्स’ समोर सिद्धार्थने आपल्या कुटुंबाबरोबर दिलेली पोज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
-
मलेशिया हे राष्ट्र तिथल्या आधुनिक शहरांसाठी आणि मनमोहक बेटांसाठी जगभरातील पर्यटकांचे पसंतीचे ठिकाण आहे.
-
येथील विमानतळावर उतरण्यापूर्वी आकाशातून दिसणारे विहंगम दृश्य पर्यटकांना भुरळ घालते.
-
(सर्व फोटो सौजन्य : सिद्धार्थ जाधव/इन्स्टाग्राम)
Uday Kotak: “मोठ्या धक्क्यासाठी तयार राहा, वेळ कमी आहे!”; कोटक महिंद्रा बँकेच्या संस्थापकांनी दिला इशारा