-
मराठी सिनेसृष्टीचा ऊर्जावान अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) सध्या आपल्या कुटुंबाबरोबर मलेशियामध्ये (Malaysia) सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
-
या सहलीतील काही अविस्मरणीय क्षण सिद्धार्थने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
या दौऱ्यात सिद्धार्थने सहकुटुंब समुद्रसपाटीपासून ६,००० फूट उंचीवर असलेल्या प्रसिद्ध ‘जेंटिंग स्कायवर्ल्ड्स थीम पार्क’ला भेट दिली.
-
साहसी राईड्स आणि निसर्गरम्य वातावरणासाठी प्रसिद्ध असलेले हे ठिकाण अबालवृद्धांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.
-
याचबरोबर, मलेशियाची ओळख असलेल्या ‘ट्विन टॉवर्स’ समोर सिद्धार्थने आपल्या कुटुंबाबरोबर एक सुंदर फोटोशूटही केले.
-
सिद्धार्थने शेअर केलेल्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
व्यावसायिक आघाडीवर बोलायचे झाले तर, सिद्धार्थ ‘प्रत्येक माणसांत दडलंय एक ॲनिमल’ या नव्या कोऱ्या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सिद्धार्थ जाधव/इन्स्टाग्राम)
Uday Kotak: “मोठ्या धक्क्यासाठी तयार राहा, वेळ कमी आहे!”; कोटक महिंद्रा बँकेच्या संस्थापकांनी दिला इशारा