-
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘येड लागलं प्रेमाचं’ (Yed Lagla Premacha) सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
-
या मालिकेत ‘मंजिरी’ची मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री पूजा बिरारी (Pooja Birari) आपल्या अभिनयाबरोबरच सोशल मीडियावरील फोटोंमुळेही नेहमीच चर्चेत असते.
-
नुकतेच पूजाने उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर एक खास फोटोशूट केले असून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
या फोटोशूटसाठी पूजाने जांभळ्या रंगाचा एक अत्यंत सुंदर ड्रेस परिधान केला आहे.
-
विशेष म्हणजे, तिने या फोटोंना ‘Turning Sweat Into Highlighter’ असे हटके कॅप्शन दिले आहे.
-
एकीकडे पूजाच्या लूकची चर्चा असतानाच, दुसरीकडे ‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेचे कथानक आता एका उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचले आहे.
-
राया आणि मंजिरीच्या आयुष्यात पुढे काय घडणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये शिगेला पोहोचली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : पूजा बिरारी/इन्स्टाग्राम)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुलेटवरून विधानभवनात दाखल, डबलसीट होते आशीष शेलार!