-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) नेहमीच आपल्या साध्या पण प्रभावी स्टाईलने चाहत्यांची मने जिंकत असते.
-
नुकतेच रिंकूने तिचे काही नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून तिच्या कॅज्युअल लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
या खास फोटोशूटसाठी रिंकूने स्ट्राइप्स शर्ट आणि डेनिम जीन्स असा कूल पेहराव केला आहे.
-
रिंकूच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
‘सैराट’ मधील ‘आर्ची’ या भूमिकेतून घराघरात पोहोचलेल्या रिंकूने अत्यंत कमी वयात आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.
-
अभिनयाबरोबरच रिंकूचा फॅशन सेन्सदेखील चाहत्यांना प्रचंड आवडतो.
-
कामाबद्दल बोलायचे झाले तर, फेब्रुवारी महिन्यात रिंकूचा ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
-
(सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरू/इन्स्टाग्राम)
“आता गच्चीवर तवा ठेवून पोळ्या भाजाव्यात म्हणतो”, पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर अभिनेते विद्याधर जोशींची मार्मिक पोस्ट!