-
सोनी मराठी वाहिनीवरील प्रेक्षकांचा लाडका विनोदी शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) हा प्रेक्षकांना खळखळून हसवत नेहमीच त्यांचे मनोरंजन करत असतो.
-
या कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिनेत्री शिवाली परब (Shivali Parab) आज महाराष्ट्रातील घराघरांत लोकप्रिय झाली आहे.
-
केवळ छोट्या पडद्यावरच नव्हे, तर तिने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.
-
नुकतीच शिवाली आपल्या कुटुंबासह देवीच्या दर्शनाला गेली होती.
-
या खास प्रसंगी शिवालीने परिधान केलेला लाल रंगाचा शरारा ड्रेस सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
शिवालीने या दर्शनाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताच चाहत्यांनी त्यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. “खूप छान कुटुंब”, “मस्त फोटो” अशा अनेक प्रतिक्रिया तिच्या चाहत्यांनी दिल्या आहेत.
-
काही दिवसांपूर्वीच शिवालीच्या एका पारंपरिक चिनी स्टाईल लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवाली परब/इन्स्टाग्राम)
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर कमल हासन यांचं चित्रपटसृष्टीला खुलं पत्र; परदेशातील शूटिंगबाबत म्हणाले…