-
Aishwarya Narkar Titeekshaa Tawde Suruchi Adarkar Saree Look: मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, सुरुची अडारकर आणि तितीक्षा तावडे सध्या सोशल मीडियावर कमालीच्या चर्चेत आहेत.
-
आपल्या सहजसुंदर अभिनयाने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या या तिघींनी नुकतेच ठाण्यात एक खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी तिघींनीही अत्यंत सुंदर आणि सुबक कॉटनच्या साड्या परिधान केल्या होत्या.
-
विशेष म्हणजे, या तिघींच्या मैत्रीचे रूपांतर आता एका यशस्वी व्यवसायात झाले आहे.
-
ऑगस्ट २०२५ मध्ये त्यांनी ‘थ्रेड अँड ठुमका By Tasvi’ हा स्वतःचा कपड्यांचा ब्रँड लाँच केला होता.
-
याच ब्रँडच्या प्रमोशनसाठी त्यांनी हे फोटोशूट केल्याचे समजते. या तिघीही सोशल मीडियावर बऱ्याच सक्रिय असून, अनेकदा एकमेकींसोबतचे फोटो आणि रील्स शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असतात.
-
त्यांच्या या नव्या साडीतील लूकलाही चाहत्यांची मोठी पसंती मिळत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऐश्वर्या नारकर/इन्स्टाग्राम)
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर कमल हासन यांचं चित्रपटसृष्टीला खुलं पत्र; परदेशातील शूटिंगबाबत म्हणाले…