-
मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय व सुप्रसिद्ध अभिनेत्री खुशबू तावडे आपल्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकत असते.
-
खुशबूने आजवर अनेक गाजलेल्या मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या खुशबूने नुकतेच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून काही नवीन आणि सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
या नवीन फोटोंमध्ये खुशबूचा एक अतिशय साधा, सोज्वळ आणि तितकाच ग्लॅमरस लूक चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.
-
शेअर केलेल्या फोटोंमध्ये अभिनेत्रीने लाल रंगाची सुंदर साडी नेसल्याचे पाहायला मिळत असून, ती अतिशय देखणी दिसत आहे.
-
खुशबू किचनमध्ये उभी राहून गॅस शेगडीजवळ अतिशय आनंदाने स्वतःसाठी चहा बनविताना दिसत आहे.
-
ती अगदी निवांतपणे बसून काचेच्या ग्लासमध्ये गरम चहाचा आस्वाद घेताना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
-
घरगुती वातावरणातील हे फोटो शेअर करीत खुशबूने या पोस्टला ‘कम्फर्ट झोन’ अशी साधी आणि सुंदर कॅप्शन दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: खुशबू तावडे/इन्स्टाग्राम)
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर कमल हासन यांचं चित्रपटसृष्टीला खुलं पत्र; परदेशातील शूटिंगबाबत म्हणाले…