-
बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री हुमा कुरेशीने (Huma Qureshi) फ्रान्समध्ये सुरू असलेल्या जगप्रसिद्ध ‘कान्स चित्रपट महोत्सव २०२६’ (Cannes Film Festival 2026) मध्ये आपल्या खास लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
या आंतरराष्ट्रीय मंचावर हुमाने पारंपरिक भारतीय पेहरावाला पसंती देत जांभळ्या रंगाची अत्यंत देखणी बनारसी साडी नेसली होती.
-
या पारंपरिक लूकला अधिक देखणं बनवण्यासाठी हुमाने त्यावर साजेसे पारंपरिक दागिने परिधान केले होते.
-
अगदी हलका पण ग्लॅमरस मेकअप आणि मोकळे केस हुमाच्या या सौंदर्याला अधिक खुलवत होते.
-
हुमाने सोशल मीडियावर हे फोटो शेअर करत, “बनारसच्या घाटांपासून ते फ्रेंच रिनिएरापर्यंत…” (From The Ghats Of Banaras To The French Riviera) असे छानसे कॅप्शन दिले आहे.
-
याविषयी आपला अनुभव सांगताना हुमा म्हणाली, “सिनेमा आणि कथाकथनाच्या या जागतिक व्यासपीठावर एका पारंपरिक भारतीय साडीच्या माध्यमातून स्वतःची वेगळी कथा मांडणं, हा माझ्यासाठी अत्यंत सुखावणारा आणि अभिमानास्पद अनुभव आहे.”
-
सध्या आंतरराष्ट्रीय स्तरासह भारतातही हुमाच्या या अस्सल भारतीय लूकचे आणि तिच्या साधेपणाचे भरभरून कौतुक होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : हुमा कुरेशी/इन्स्टाग्राम)
“आम्ही कुणाच्या मुली वाढवत आहोत?”; IVF नंतर डीएनए रिपोर्ट समोर आल्यानंतर जोडप्याची भीती ठरली खरी