-
महाराष्ट्राची लाडकी नृत्यांगना आणि सोशल मीडिया स्टार गौतमी पाटील (Gautami Patil) सध्या चर्चेत आली आहे.
-
आपल्या नृत्याने आणि अदांनी संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ घालणाऱ्या गौतमीने नुकतेच समुद्रकिनारी एक खास फोटोशूट केले आहे.
-
काही दिवसांपूर्वीच गौतमीचे ‘तू मोरनी’ हे गाणं यूट्यूबवर रिलीज झाले असून, या गाण्याच्या निमित्तानेच तिने हे फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी गौतमीने निळ्या रंगाची नऊवारी साडी आणि त्यावर कॉन्ट्रास्ट गुलाबी रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला होता.
-
या पारंपरिक लूकला मराठमोळा साज देत गौतमीने गळ्यात हार, नाकात नथ आणि हातात हिरव्या बांगड्या घातल्या होत्या.
-
मात्र, या सगळ्या पारंपरिक पेहरावात गौतमीने डोळ्यांवर चढवलेला गॉगल आणि दिलेल्या हटके पोजेस नेटकऱ्यांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत.
-
पारंपरिकता आणि मॉडर्न स्टाईलचा हा फ्युजन लूक गौतमीच्या चाहत्यांच्या भलताच पसंतीस पडत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : गौतमी पाटील/इन्स्टाग्राम)
“अनेक जोडप्यांसाठी आदर्श आहेत….”, भाग्यश्रीने केलं रितेश-जिनिलीयाचं कौतुक; ‘राजा शिवाजी’च्या सेटवरचे किस्से सांगत म्हणाली…