-
स्टार प्रवाह वाहिनीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका ‘घरोघरी मातीच्या चुली’ने (Gharoghari Matichya Chuli TV Serial) अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे.
-
या मालिकेत ‘माया’ ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारी अष्टपैलू अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashvini Mahangade) सध्या तिच्या एका नवीन फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
-
अश्विनीने नुकतेच पारंपरिक साडीत एक मनमोहक फोटोशूट केले असून, त्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
-
या फोटोशूटसाठी अश्विनीने केशरी रंगाची देखणी बनारसी साडी परिधान केली आहे.
-
या साडीला साजेसा असा मॅचिंग आरी वर्क असलेला ब्लाऊज आणि गळ्यात पारंपरिक दागिन्यांचा साज परिधान करून तिने तिचे सौंदर्य अधिकच खुलवले आहे.
-
अश्विनीचा हा मराठमोळा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत असून, तिच्यावर लाईक्स अन् कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
अश्विनीने यापूर्वी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील ‘राणूअक्का’ आणि ‘आई कुठे काय करते’ या लोकप्रिय मालिकेतील ‘अनघा’ या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अश्विनी महांगडे/इन्स्टाग्राम)
तुकाराम मुंढे यांची अखेर उचलबांगडी