-
जागतिक चित्रपटसृष्टीतील अत्यंत मानाचा आणि प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘७९ वा कान्स चित्रपट महोत्सव २०२६’ (Cannes Film Festival 2026) सध्या फ्रान्समध्ये मोठ्या उत्साहात सुरू आहे.
-
१२ मे ते २३ मे दरम्यान रंगणाऱ्या या सोहळ्यात जगभरातील दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली आहे.
-
यंदाच्या महोत्सवात बॉलिवूड अभिनेत्री आदिती राव हैदरीने (Aditi Rao Hydari) आपल्या ग्लॅमरस अंदाजाने रेड कार्पेटवर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
या जागतिक मंचावर आदितीने पाश्चात्त्य कपड्यांऐवजी पारंपरिक भारतीय वेशभूषेला पसंती दिली.
-
आदितीने परिधान केलेल्या सोनेरी रंगाच्या डिझायनर साडीतील ग्लॅमरस लूकची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
-
आपल्या या रॉयल लूकला आणखी खास बनवण्यासाठी आदितीने गळ्यात एक भारदस्त सोन्याचा नेकलेस परिधान केला होता.
-
विशेष म्हणजे, तिने कानातले किंवा हातात बांगड्या न घालता आपले संपूर्ण लूक स्टेटमेंट केवळ त्या नेकलेसवर केंद्रित ठेवले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : आदिती राव हैदरी/इन्स्टाग्राम)
‘२० वर्षांची पुडीची सवय तुकाराम मुंढे साहेबांमुळे सुटली’; समर्थकाची पोस्ट चर्चेत