-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री तितीक्षा तावडे (Titeekshaa Tawde) सध्या तिच्या एका पारंपरिक लूकमुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.
-
नुकतेच तितीक्षाने तिचे काही खास फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये तितीक्षाने गुलाबी रंगाची अत्यंत सुंदर अशी खणाची साडी नेसली आहे.
-
या गुलाबी साडीला अधिक आकर्षक बनवण्यासाठी तितीक्षाने त्यावर जांभळ्या रंगाचा स्टायलिश स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे.
-
तितीक्षाचा हा पारंपारिक आणि आधुनिकतेचा सुरेख संगम चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
-
विशेष म्हणजे, तितीक्षाने नेसलेली ही साडी तिच्या स्वतःच्या ‘थ्रेड अँड ठुमका’ (Thread & Thumka) या ब्रँडची आहे.
-
हा ब्रँड केवळ तितीक्षाचा एकटीचा नसून, यामध्ये मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि लोकप्रिय अभिनेत्री सुरुची अडारकर यांचीही भागीदारी आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : तितीक्षा तावडे/इन्स्टाग्राम)
Photos: ‘ठाकरे कुटुंबाच्या कृपेनेच आयुष्याचं सोनं झालं’; लेकीच्या पदवीप्रदान सोहळ्यानंतर बाळा नांदगावकरांची भावनिक पोस्ट