-
मराठी चित्रपटसृष्टीची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) फ्रान्समधील प्रतिष्ठित ७९ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलला (Cannes Film Festival 2026) हजेरी लावली आहे.
-
या जागतिक मंचावर ‘भारत पॅव्हेलियन’ (India Pavilion) अंतर्गत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
-
मराठी भाषेला मिळालेल्या अभिजात दर्जाच्या पार्श्वभूमीवर, ‘अभिजात मराठी’चे ग्लोबल लाँचिंग करण्यासाठी प्राजक्ता तिथे अधिकृत डेलिगेट (प्रतिनिधी) म्हणून उपस्थित आहे.
-
विशेष म्हणजे, कान्सच्या मंचावर प्राजक्ता एकटी नसून तिच्याबरोबर महाराष्ट्राचे लाडके ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, अभिनेत्री निवेदिता सराफ, प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, निर्माता केदार जोशी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर (कोकण हर्टेड गर्ल) हे देखील उपस्थित आहेत.
-
जागतिक स्तरावर मराठीचा डंका वाजवणारी ही एक मोठी अधिकृत टीम ठरली आहे.
-
प्राजक्ताने या महोत्सवातील तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
यात प्राजक्ताने परिधान केलेल्या लाल रंगाच्या स्टायलिश ऑफ-शोल्डर गाऊनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
या फोटोंना प्राजक्ताने ‘Having My Cannes Moments’ असे कॅप्शन दिले असून, तिच्या या लूकवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी/इन्स्टाग्राम)
Photos: ‘ठाकरे कुटुंबाच्या कृपेनेच आयुष्याचं सोनं झालं’; लेकीच्या पदवीप्रदान सोहळ्यानंतर बाळा नांदगावकरांची भावनिक पोस्ट