-
फ्रान्समधील प्रतिष्ठित ७९ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरने हजेरी लावली. फ्रान्समध्ये जातानाचा तिचा एअरपोर्ट लूकही व्हायरल झाला होता.
-
तिथे जाण्यामागचा तिचा उद्देश आता समोर आला आहे.
-
फ्रान्सच्या ७९ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारत पॅव्हिलियनमध्ये अभिजात मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मचे आंतरराष्ट्रीय लॉचिंग करण्यात आले. “आज मराठी भाषेमुळे आणि मराठी भाषेसाठी मी इथपर्यंत आलेय, याचा मला मनापासून अभिमान आहे.Cannes Film Festival मध्ये येऊन भारत पॅव्हिलियनमध्ये आम्ही अभिजात मराठी OTT चे आंतरराष्ट्रीय स्तरावर लॉन्च करत आहोत, याचा आम्हाला अत्यंत अभिमान आहे”, असं अंकिताने म्हटलं.
-
या कार्यक्रमासाठी अंकिता वालावलकरसह मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, अभिनेत्री निवेदिता सराफ, प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, निर्माता केदार जोशी आदीजण प्रतिनिधी म्हणून गेले हते.
-
“आपली मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि दर्जेदार मराठी कंटेंट आता जागतिक स्तरावरील मराठी भाषिकांसाठी तसेच इतर प्रेक्षकांसाठीही उपलब्ध होणार आहे. मराठीचा आवाज आता फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहणार नाही, तर जगभर पोहोचणार आहे. ही फक्त एका OTT ची सुरुवात नाही, तर मराठी भाषेला आणि मराठी कलाविश्वाला जागतिक व्यासपीठावर नेण्याचा एक अभिमानास्पद प्रवास आहे.ह्याचा एक भाग होता येणं हेच माझ्यासाठी भाग्य आहे”, असं अंकिताने म्हटलं आहे.
-
तिने या कार्यक्रमासाठी वेल्वेटचा टुपीस ड्रेस परिधान केला होता. यामध्ये ती अत्यंत खुलून दिसत होती.
-
यानिमित्ताने अंकिताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
-
अंकिताच्या निमित्ताने कोकणची चेडू फ्रान्समध्ये पोहोचली.
-
सर्व फोटो – अंकिता वालावलकर/Instagram
भारतात टेलिग्रामवर बंदी, नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय