-
लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर हिचा विवाहसोहळा नुकताच अत्यंत दिमाखात पार पडला.
-
तिच्या या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या आणि आनंदाच्या क्षणी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी आवर्जून हजेरी लावली होती.
-
या लग्नाला ज्ञानदाचा सहकलाकार आणि अभिनेता विजय आंदळकर यानेदेखील पत्नी रूपालीबरोबर विशेष उपस्थिती दर्शवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
-
विजय आणि रूपाली या जोडीने लग्नातील त्यांचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करीत चाहत्यांना त्यांच्या या लूकची झलक दाखवली आहे.
-
रूपालीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून हे फोटो शेअर करीत ‘वेडिंग डायरी, कपल लव्ह’ अशी कॅप्शन लिहिली आहे.
-
विजयने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि त्यावर काळ्या रंगाचा कोट-वेस्टकोट (नेहरू जॅकेट स्टाईल) परिधान करीत एक रॉयल लूक केला होता.
-
रूपालीने या खास प्रसंगी सुंदर अशी पिवळसर-हिरव्या रंगाची (लाईम ग्रीन) डिझायनर साडी आणि त्यावर सोनेरी रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला होता.
-
त्यांच्या या पोस्टमधील जोडप्याच्या एकत्र फोटोमध्ये रूपालीने विजयच्या हाताला पकडून दिलेली रोमँटिक पोज चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: विजय आंदळकर /इन्स्टाग्राम)
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाचा पदभार स्वीकारला! सरकारने पदावनती केल्याची मुंढेची भावना; दीड महिना ठेवलेले प्रतीक्षेत