-
माधुरी दीक्षित व डॉ श्रीराम नेने बॉलीवूडमधील लोकप्रिय सेलिब्रिटी कपल आहेत.
-
माधुरी व श्रीराम नेने सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि अनेकदा त्यांच्या जीवनातील घडामोडींबद्दलच्या अपडेट शेअर करत असतात. अशातच आता श्रीराम नेनेंनी नुकतीच एक खास पोस्ट शेअर केली आहे.
-
श्रीराम नेने अनेकदा कुटुंबीयांबरोबरचे फोटो पोस्ट करत असतात अशातच आता त्यांनी त्यांच्या भाचीचं ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानिमित्त काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंना त्यांनी खास कॅप्शन दिली आहे. या पोस्टमधून त्यांनी म्हटलं की माझी भाची माया हिने बर्कले आणि हासमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केल्याबद्दल तिचे मनापासून अभिनंदन. तिच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. या निमित्ताने माझी बहीण सीमा, आई-वडील, रूपा आणि संपूर्ण कुटुंबासोबत वेळ घालवता आला, याचा खूप आनंद झाला. कुटुंब हे आयुष्यातील दीर्घ आणि आनंदी प्रवासासाठी खूप महत्त्वाचं असतं.
-
या फोटोंमध्ये माधुरी, श्रीराम नेने आणि त्यांची भाची माया एकत्र पोज देताना दित आहेत. तर याचबरोबर माधुरी दीक्षित तिच्या सासरच्या मंडळींबरोबर वेगवेगळ्या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे. यावेळी माधुरी व तिची दोन मुलंसुद्धा असल्याचं दिसतं.
-
या फोटोंमधून माधुरी दीक्षितचे सासू-सासरे, पती, दोन मुलं, नंणद आणि इतर मंडळी दिसत आहेत. एकूणच माधुरीचं सासरचं कुटुंब खूप मोठं असल्याचं या पोस्टमधून कळतं.
-
-
माधुरी दीक्षितही अनेकदा तिच्या पतीबरोबरचे फोटो पोस्ट करताना दिसते.
-
(सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाचा पदभार स्वीकारला! सरकारने पदावनती केल्याची मुंढेची भावना; दीड महिना ठेवलेले प्रतीक्षेत