-
जगातील सर्वात प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ यंदा १२ मेपासून सुरू झाला आहे.
-
या ७९ व्या कान्स चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने मराठी मनोरंजन विश्वातील अनेक प्रसिद्ध कलाकार सध्या फ्रान्समध्ये दाखल झाले आहेत.
-
या महोत्सवासाठी अशोक सराफ, निवेदिता सराफ, प्राजक्ता माळी आणि अंकिता वालावलकर हे कलाकारसुद्धा फ्रान्सला पोहोचले आहेत.
-
अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी कान्सच्या रेड कार्पेटवर अतिशय सुंदर आणि पारंपरिक लूक केला होता.
-
या जागतिक मंचावर निवेदिता सराफ यांनी फिकट निळ्या आणि जांभळ्या रंगाची सुंदर पैठणी साडी परिधान केली होती.
-
या लूकसाठी त्यांनी परिधान केलेल्या ब्लाऊजने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या जांभळ्या रंगाच्या ब्लाऊजच्या पाठीवर तीन पारंपरिक महिलांचे सुंदर चित्र रेखाटलेले दिसत आहे. या चित्रातील एका महिलेच्या हातात पाटी असून त्यावर ‘मराठी’ असे अभिमानाने लिहिलेले आहे.
-
गळ्यात सुंदर हार, कानात डूल आणि नाकात पारंपरिक मराठी नथ घालून त्यांनी आपले सौंदर्य अधिकच खुलवले आहे.
-
हे खास फोटो शेअर करत त्यांनी, ‘परंपरेतलं सौंदर्य जेव्हा जागतिक मंचावर खुलतं… तेव्हा तयार होतो अभिमानाचा क्षण’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: निवेदिता सराफ, प्राजक्ता माळी आणि अंकिता वालावलकर /इन्स्टाग्राम)
Video : माधुरी दीक्षितच्या प्रसिद्ध गाण्यावर शिवानी सुर्वेची सुंदर रील