-
मराठी मनोरंजन विश्वातील आघाडीची आणि लोकप्रिय अभिनेत्री मिताली मयेकर (Mitali Mayekar) सध्या तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे.
-
आपल्या दर्जेदार अभिनयाबरोबरच बोल्ड आणि सडेतोड स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या मितालीने नुकतेच सोशल मीडियावर काही नवे फोटो शेअर केले आहेत.
-
बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या मितालीने या नव्या फोटोशूटसाठी खास पारंपरिक लूक निवडला आहे.
-
मितालीने लाल आणि सोनेरी काठ असलेली हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली आहे.
-
या नऊवारी लूकवर मितालीने मोत्यांच्या पारंपरिक दागिन्यांचा साज केला आहे.
-
मितालीने या फोटोशूटला ‘तोच चंद्रमा नभात…’ असे कॅप्शन दिले आहे.
-
पारंपरिक मराठमोळ्या रूपातल्या मितालीच्या या फोटोंवर सध्या चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मिताली मयेकर/इन्स्टाग्राम)
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाचा पदभार स्वीकारला! सरकारने पदावनती केल्याची मुंढेची भावना; दीड महिना ठेवलेले प्रतीक्षेत