-
प्रिया बापट व उमेश कामत यांच्याकडे मराठी मनोरंजन विश्वातील आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. हे दोघंही सध्या फिरायला मालदीवला गेले आहेत.
-
इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत उमेशने त्यांच्या ‘मालदीव जर्नी’ची खास झलक चाहत्यांना दाखवली आहे
-
मालदीवचा निळाशार समुद्र, निसर्गरम्य वातावरण, वॉटर व्हिला या सगळ्याची झलक प्रिया-उमेशने शेअर केलेल्या फोटोंमध्ये पाहायला मिळत आहे.
-
प्रिया-उमेशने मालदीवमध्ये स्कुबा डायव्हिंग सुद्धा केलं.
-
क्रिस्टल-क्लिअर निळाशार समुद्र, सागरी जीवसृष्टी, प्रवाळं यामुळे मालदीव हे जगातील सर्वोत्तम डायव्हिंग डेस्टिनेशनपैकी एक म्हणून ओळखलं जातं.
-
उमेशने शेअर केलेल्या फोटोंमध्ये मालदीवमधील रेस्टॉरंटची झलकही पाहायला मिळतेय.
-
मालदीवमध्ये समुद्रकिनाऱ्याजवळ पर्यटकांसाठी सुंदर झोपाळे अन् ठिकठिकाणी हॅमॉक (Hammocks) असल्याचं पाहायला मिळतं. याठिकाणी पर्यटक सुंदर फोटोशूट करतात.
-
उमेशने स्कुबा डायव्हिंगचा सोलो फोटो शेअर करत याला ‘Happy After’ असं कॅप्शन दिलं आहे.
-
प्रिया-उमेशच्या या मालदीव ट्रिपच्या फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. नुकतेच ते दोघं ‘हे काय नवीन?’ या सीरिजमध्ये एकत्र झळकले. याशिवाय प्रिया-उमेश ‘जर तरची गोष्ट’ या नाटकातही एकत्र काम करत आहेत. ( सर्व फोटो सौजन्य : प्रिया बापट व उमेश कामत इन्स्टाग्राम )
प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम! मान्सूनच्या प्रगतीस पोषक वातावरण