-
सोनी मराठी वाहिनीवरील प्रेक्षकांचा लाडका विनोदी कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) नेहमीच प्रेक्षकांना खळखळून हसवत असतो.
-
या कार्यक्रमातून अभिनेत्री चेतना भटने (Chetana Bhat) आपल्या अतरंगी विनोदी शैलीने घराघरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
मंचावरील चेतनाच्या भन्नाट परफॉर्मन्सची प्रेक्षक नेहमीच उत्सुकतेने वाट पाहत असतात.
-
सध्या सोशल मीडियावर चेतनाच्या अभिनय कौशल्याबरोबरच तिच्या एका नव्या फोटोशूटची जोरदार चर्चा सुरू आहे.
-
या फोटोशूटसाठी चेतनाने पोपटी रंगाची सुंदर सिल्क साडी परिधान केली असून, त्यावर भरजरी दागिन्यांचा सुरेख साज केला आहे.
-
या फोटोंना चेतनाने ‘नथीशिवाय शृंगार हा अपूर्णच’ असे कॅप्शन दिले आहे.
-
पारंपरिक लूकमध्ये चेतनाचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : चेतना भट/इन्स्टाग्राम)
Video : हल्ला करणारे RSSचे लोक, संघभूमीत पाय ठेवताच अभिजित दिपकेंचा मोठा आरोप