-
दिग्दर्शक प्रविण तरडे (Pravin Tarde) यांचा बहुप्रतिक्षित ‘देऊळ बंद २’ (Deool Band 2 Movie) हा चित्रपट आज (२१ मे) अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
-
२०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘देऊळ बंद’ (Deool Band Movie) हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला होता.
-
त्यानंतर आता तब्बल १० वर्षांनी या चित्रपटाचा सिक्वेल (दुसरा भाग) रुपेरी पडद्यावर दाखल झाला आहे.
-
या चित्रपटात एक शेतकरी महिला थेट देवाची परीक्षा घेताना दिसणार आहे.
-
शेतकऱ्यांची सद्यस्थिती, दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्या यांसारख्या अत्यंत गंभीर व संवेदनशील प्रश्नांवर ही महिला देवाला जाब विचारताना यात पाहायला मिळेल.
-
दरम्यान, चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या मराठीतील आघाडीची अभिनेत्री संस्कृती बालगुडेने (Sanskruti Balgude) सोशल मीडियावर चित्रपटाच्या सेटवरील काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
याही भागात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी ‘श्री स्वामी समर्थांची’ मध्यवर्ती भूमिका साकारली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : संस्कृती बालगुडे/इन्स्टाग्राम)
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली? मुख्यमंत्र्यांसह सरकारला थेट इशारा