-
मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय जोडी, अभिनेता शुभंकर एकबोटे (Shubhankar Ekbote) आणि अभिनेत्री अमृता बने (Amruta Bane) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
सध्या हे दोघेही कडक उन्हाळ्यात सुट्ट्यांचा आनंद घेत असून, त्यांनी थेट स्विमिंग पूलमध्ये एक हटके फोटोशूट केले आहे.
-
या फोटोंना शुभंकरने ‘मैं तेरा Hero’ असे कॅप्शन दिले असून, त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
-
शुभंकरने केवळ मराठीतच नव्हे, तर हिंदी मनोरंजन विश्वातही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.
-
दिग्दर्शक सुरज पारसनीस यांच्या ‘ही दोस्ती तुटायची नाय’ (Hi Dosti Tutaychi Naay Natak) या नव्या नाटकात शुभंकर आणि अमृता मुख्य भूमिकेत आहेत.
-
विशेष म्हणजे, या नाटकाची मांडणी आणि सादरीकरण इतर कौटुंबिक किंवा व्यावसायिक नाटकांपेक्षा अत्यंत वेगळे आहे.
-
लेखक ओंकार गोखले यांनी या नाटकाचे लेखन केले आहे. आजवर मराठी रंगभूमीवर काहीशा अस्पर्श राहिलेल्या आणि वैवाहिक आयुष्यात सहसा दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या एका महत्त्वाच्या मुद्द्याला त्यांनी या नाटकाच्या माध्यमातून ऐरणीवर आणले आहे. त्यामुळे या जोडीला रंगभूमीवर एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : शुभंकर एकबोटे/इन्स्टाग्राम)
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली? मुख्यमंत्र्यांसह सरकारला थेट इशारा