-
मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने नुकताच तिचा वाढदिवस साजरा केला.
-
१८ मे रोजी अभिनेत्रीने तिचा वाढदिवस उत्साहात साजरा केला असून सध्या ती तिच्या पतीसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
-
सोनाली कुलकर्णी आणि तिचा पती कुणाल बेनोडेकर हे दोघेही सध्या क्रोएशियामधील ‘ह्वार’ (Hvar) या सुंदर बेटावर फिरताना दिसत आहेत.
-
या फोटोंमध्ये सोनाली आणि कुणालची रोमँटिक केमिस्ट्री नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
शेअर केलेल्या एका फोटोमध्ये हे क्यूट कपल एड्रियाटिक समुद्राच्या बॅकग्राउंडवर एकमेकांना किस करताना दिसत आहे.
-
तसेच एका फोटोत सोनाली लाल रंगाचे ट्रॅक जॅकेट, पांढरी कॅप घालून निसर्गाचा आनंद घेताना पाहायला मिळत आहे.
-
हे फोटो शेअर करताना सोनालीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “विश्वास करा, आम्ही फक्त इथे पोझ देत आहोत, सिंगापूरच्या मुलींच्या एका ग्रुपला आमचा एकत्र फोटो काढायला सांगितला आणि त्यांनी आमच्याकडून हे करून घेतलं.”
-
सोनालीच्या या फोटोंवर चाहत्यांनी आणि अनेक कलाकारांनी लाईक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: सोनाली कुलकर्णी /इन्स्टाग्राम)
अभिनेत्री संचिता उगलेचं सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी कनेक्शन? संचिताच्या भावाचा खळबळजनक आरोप