-
अभिनेत्री नम्रता संभेराव ही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून घराघरांत पोहोचलेली एक अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे.
-
आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना हसवणारी नम्रता सध्या कुटुंबासोबत पंजाबमधील अमृतसर येथे सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
-
या दरम्यान नम्रताने तिचे पती योगेश संभेराव आणि लाडका मुलगा रुद्राज यांच्यासोबत सुवर्ण मंदिराला (गोल्डन टेम्पल) भेट दिली.
-
सुवर्ण मंदिराला भेट देताना नम्रताने निळ्या आणि पांढऱ्या रंगाचा फ्लोरल प्रिंटेड ड्रेस परिधान केला असून डोक्यावर ओढणी घेतली आहे.
-
या फोटोंमध्ये नम्रता सुवर्ण मंदिराच्या विहंगम पार्श्वभूमीवर हात जोडून अत्यंत प्रसन्न चेहऱ्याने पोझ देताना दिसत आहे.
-
दुसऱ्या फोटोत तिचा पती योगेश तपकिरी रंगाचा शर्ट आणि पांढऱ्या पँटमध्ये तर मुलगा रुद्राज पांढऱ्या कुर्त्यात दिसत आहे.
-
सुवर्ण मंदिराच्या परंपरेनुसार योगेश आणि रुद्राज या दोघांनीही डोक्यावर केशरी रंगाचा रुमाल बांधल्याचे पाहायला मिळत आहे.
-
हे कौटुंबिक फोटो शेअर करत नम्रताने ‘Golden temple, श्री हरमंदिर साहिब, गुरुद्वारा, Blessed’ अशी भक्तीमय कॅप्शन दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: नम्रता संभेराव/इन्स्टाग्राम)
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली? मुख्यमंत्र्यांसह सरकारला थेट इशारा