-
बॉलिवूडची प्रसिद्ध दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान (Farah Khan) सध्या अत्यंत आनंदी आणि अभिमानास्पद वातावरणात आहे.
-
फराहची तिळी मुले दिवा, आन्या आणि जार यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण केले असून, त्यांचा ग्रॅज्युएशन सोहळा नुकताच थाटामाटात पार पडला.
-
फराहने या खास क्षणाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत एक भावनिक पोस्ट लिहिली आहे, जी सध्या नेटीझन्सचे लक्ष वेधून घेत आहे.
-
या दिमाखदार सोहळ्यात ‘रिलायन्स फाउंडेशन’च्या संस्थापिका आणि अध्यक्षा नीता अंबानी यांच्या हस्ते फराहच्या तिन्ही मुलांना पदव्या प्रदान करण्यात आल्या.
-
या सोहळ्याला भारताची स्टार बॅडमिंटनपटू आणि ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू हिनेही विशेष उपस्थिती लावली होती.
-
मुलांच्या या यशावर आणि पुढील प्रवासावर भाष्य करताना फराहने लिहिले, “मुलांना लहानाचं मोठं करणं जास्त कठीण आहे की त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी पंख देणे, हेच मला समजत नाहीये. त्यांनी त्यांच्या स्वप्नांच्या आकाशात उंच भरारी घ्यावी… हे घर त्यांच्यासाठी नेहमीच पाठीशी असेल.”
-
फराहच्या या भावूक पोस्टवर बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी आणि चाहत्यांनी कमेंट्स करत तिन्ही मुलांवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : फराह खान/इन्स्टाग्राम)
“अनेक जोडप्यांसाठी आदर्श आहेत….”, भाग्यश्रीने केलं रितेश-जिनिलीयाचं कौतुक; ‘राजा शिवाजी’च्या सेटवरचे किस्से सांगत म्हणाली…