-
लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी (Tripti Dimri) लवकरच ‘माँ बहन’ (Maa Behen) या डार्क क्राईम-कॉमेडी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
-
नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा कमालीच्या उत्साहात पार पडला.
-
या खास सोहळ्यासाठी तृप्तीने परिधान केलेल्या निळ्या रंगाच्या सुंदर अनारकली ड्रेसमधील काही निवडक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या चित्रपटात तृप्तीबरोबरच बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित, प्रसिद्ध डिजिटल इन्फ्लूएन्सर धरणा दुर्गा आणि दिग्गज अभिनेते रवी किशन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
-
या चित्रपटाचे कथानक एका मध्यमवर्गीय कॉलनीतील आई आणि तिच्या दोन मुलींच्या प्रवासाभोवती फिरते.
-
यामध्ये माधुरी दीक्षित ‘रेखा’ नावाच्या आईची भूमिका साकारत असून, तृप्ती (जया) आणि धरणा (सुषमा) तिच्या मुलींच्या भूमिकेत नजर पडणार आहेत.
-
हा बहुप्रतीक्षित चित्रपट येत्या ४ जून २०२६ रोजी थेट ‘नेटफ्लिक्स’ (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : तृप्ती डिमरी/इन्स्टाग्राम)
आजपासून सूर्याचे मिथुन राशीत पदार्पण; ‘या’ ५ राशींवर होणार पैशांचा पाऊस, तर ‘या’ राशींना आरोग्याची घ्या काळजी