-
बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण केले आहे.
-
शिल्पाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर या खास कार्यक्रमाचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये शिल्पा शेट्टी अतिशय साध्या आणि पारंपरिक लूकमध्ये पाहायला मिळत आहे.
-
तिने या कार्यक्रमासाठी पांढऱ्या रंगाचा फ्लोरल प्रिंटेड सलवार-कुर्ता परिधान केला होता.
-
वृक्षारोपणाच्या या कार्यक्रमात शिल्पा शेट्टीसोबत मुंबईच्या माजी महापौर रितू तावडे उपस्थित होत्या.
-
यासोबतच भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनीही या पर्यावरणविषयक मोहिमेत सहभाग घेतला होता.
-
शिल्पाने फोटो शेअर करत लिहिले की, मी आजची सुंदर सकाळ वृक्षारोपण करून घालवली आणि मातीमध्ये ‘मंडे मोटिव्हेशन’ शोधले.
-
या पर्यावरणदिनी आपण सर्वांनी पृथ्वीसाठी आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी अधिक हरित जगण्याचा संकल्प करूया, असे आवाहन शिल्पाने केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य:शिल्पा शेट्टी/इन्स्टाग्राम)
Video : हल्ला करणारे RSSचे लोक, संघभूमीत पाय ठेवताच अभिजित दिपकेंचा मोठा आरोप