-
बॉलीवूडची ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित तिच्या आगामी ‘माँ बहन’ या नवीन चित्रपटामुळे सध्या जबरदस्त चर्चेत आहे.
-
हा बहुप्रतीक्षित डार्क कॉमेडी चित्रपट येत्या ४ जून रोजी थेट ‘नेटफ्लिक्स’ (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
-
या चित्रपटाच्या निमित्ताने तिने चाहत्यांसाठी आपले एक अतिशय सुंदर आणि फ्रेश फोटोशूट शेअर केले आहे.
-
हे नवीन फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताना माधुरीने ‘Mood: soft focus & fresh flowers’ असे सुंदर कॅप्शन दिले आहे.
-
या नव्या फोटोशूटमध्ये माधुरीची अनोखी फॅशन आणि तिची साडी नेसण्याची वेगळी स्टाईल सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
या रंगीबेरंगी फ्लोरल प्रिंट साडीवर तिने पांढऱ्या रंगाचा सुंदर फुलांची नक्षी असलेला डिझायनर शर्ट ब्लाऊज परिधान केला आहे.
-
या साडीच्या लूकला अधिक आकर्षक आणि स्टायलिश बनवण्यासाठी तिने कंबरेवर एक मॅचिंग ब्रॉड बेल्टदेखील बांधला आहे.
-
माधुरीला या नवीन रूपात पाहिल्यानंतर प्रेक्षक तिच्या ‘माँ बहन’ या आगामी चित्रपटासाठी आता प्रचंड उत्सुक झाले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: माधुरी दीक्षित/इन्स्टाग्राम)
तुकाराम मुंढे यांची अखेर उचलबांगडी