-
रितेश देशमुख मराठी व हिंदी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आहे.
-
रितेश गेल्या काही दिवसांपासून त्याच्या ‘राजा शिवाजी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
-
१ मे रोजी त्याने दिग्दर्शन केलेला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यामध्ये अभिनेता छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असून अनेक लोकप्रिय हिंदी व मराठी कलाकार झळकत आहेत.
-
‘राजा शिवाजी’ सिनेमाला प्रदर्शित होऊन २७ दिवस झाले असून चित्रपटाने कोट्यवधींची कमाई केली आहे. अजूनही प्रेक्षक सिनेमागृहांमध्ये चित्रपट पाहण्यासाठी गर्दी करत आहेत.
-
रितेशसुद्धा याबद्दल अनेकदा पोस्ट शेअर करत असतो. चित्रपट बनवताना त्याच्याबरोबर असलेल्या प्रत्येकाचं तो कौतुक करत आहे.
-
अशातच रितेशने पद्मश्री पुरस्कार विजेते लोकप्रिय सिनेमॅटोग्राफर संतोष सिवन यांच्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे.
-
-
पोस्टला मोठी कॅप्शन देत त्यांने ‘राजा शिवाजी’च्या सिनेमॅटोग्राफरचे आभार मानले आहेत.
-
संतोष सिवन रितेश, जिनिलीया आणि त्यांच्या मुलाबरोबर संवाद साधत असतानाचे फोटो अभिनेत्याने शेअर केले आहेत. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)
आयुक्त तुकाराम मुंढे यांचा कारवाईचा धडाका; सलग दुसऱ्या दिवशी कारवाई, फळ व्यापारी, खवा, तुप उत्पादक निशान्यावर