-
‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही नवी मालिका सध्या प्रेक्षकांच्या आणि चाहत्यांच्या चांगल्याच पसंतीस पडत आहे.
-
मालिकेत तेजश्री स्वानंदी ही भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारत असून तिच्या अभिनयाचे कौतुक होत आहे.
-
दरम्यान, तेजश्रीने सोशल मीडियावर तिचे काही नवीन आणि हटके फोटो शेअर केले आहेत.
-
तिने गडद लाल रंगाचा एक सुंदर आणि स्टायलिश शॉर्ट वनपीस परिधान केला आहे.
-
हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने डोळ्यांवर चष्मा लावला असून हातात जादूची छडी पकडली आहे.
-
मोकळे केस आणि चेहऱ्यावरील गोड हसू तिच्या या एकूण अवताराला अधिकच आकर्षक बनवत आहे.
-
तेजश्रीचा हा ग्लॅमरस आणि क्यूट अंदाज सध्या तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: तेजश्री प्रधान/इन्स्टाग्राम)
आई गं, “गोऱ्या गोऱ्या टाचत काटा रुतला” गाण्यावर चिमुकलीची लावणी; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “ही खूप मोठी कलाकार होणार”