-
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील आपले अलिशान अपार्टमेंट कुवेत महावाणिज्य दूतावासाला वार्षिक १.९२ कोटी रुपये भाड्याने दिले आहे. Instagram/ Sonakshi Sinha
-
हे अपार्टमेंट कुवेतचे महावाणिज्य दूत इमाद अब्दुल अझीझ अल-खारझ, त्यांचे कुटुंबीय आणि कर्मचारी यांच्या निवासी वापरासाठी भाड्याने घेण्यात आले आहे. Instagram/ Sonakshi Sinha
-
‘सीआरई मॅट्रिक्स’ च्या माहितीनुसार, वांद्रे पश्चिम येथील ‘८१ ऑरेट’ या प्रीमियम निवासी टॉवरमध्ये असलेले हे अपार्टमेंट ४,३५० चौरस फूट आहे. Instagram/ Sonakshi Sinha
-
२५ मे २०२६ रोजी या भाडेकराराची नोंदणी करण्यात आली. दस्तऐवजांनुसार, या व्यवहारासाठी ९६,००० रुपये मुद्रांक शुल्क आणि १,००० रुपये नोंदणी शुल्क भरण्यात आले आहे. Instagram/ Sonakshi Sinha
-
करारानुसार, या मालमत्तेचे मासिक भाडे १६ लाख रुपये आहे. या भाडेकराराचा कालावधी ७ जून २०२६ पासून सुरू होणार असून तो ६ जून २०२७ पर्यंत असेल. Instagram/ Sonakshi Sinha
-
अपार्टमेंट तीन पार्किंग स्पेस आणि निवासी संकुल आणि जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध आहेत. Instagram/ Sonakshi Sinha
-
यामध्ये व्यायामशाळा आणि ओपन स्काय फिटनेस सेंटर, क्लबहाऊस, ग्रंथालय आणि कॉन्फरन्स रूम आहे. Instagram/ Sonakshi Sinha
-
जॉगिंग ट्रॅक आणि लँडस्केप गार्डन्स, मुलांसाठी खेळण्याची जागा, महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र स्विमिंग पूल आहे. Instagram/ Sonakshi Sinha
तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये, एफडीएकडून पतंजली समूहाशी संबंधित औषधी जप्त…