-
‘फायनान्शियल एक्सप्रेस’च्या २०२५ मधील एका अहवालानुसार, सलमान खानची एकूण संपत्ती २,९०० कोटी रुपये इतकी आहे. (फोटो- Instagram/ Salman Khan)
-
सेलिब्रिटी नेट वर्थच्या आकडेवारीनुसार, जून २०१७ ते जून २०१८ या एकाच वर्षाच्या कालावधीत सलमानने तब्बल ४० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स कमावले होते. (फोटो- Instagram/ Salman Khan)
-
सलमान एका चित्रपटासाठी साधारणपणे १०० कोटी रुपये मानधन घेतो, जे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधनांपैकी एक मानले जाते. (फोटो- Instagram/ Salman Khan)
-
अभिनयच नव्हे, तर सलमान चित्रपट निर्माता म्हणूनही तो मोठी कमाई करतो. त्याने चिल्लर पार्टी (२०११), डॉ. कॅबी (२०१४) आणि राधे (२०२०) यांसारख्या अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे.(फोटो- Instagram/ Salman Khan)
-
सलमान खानच्या अफाट लोकप्रियतेमुळे जाहिरात जगतात त्याला प्रचंड मागणी आहे. विविध जाहिरातींमधून तो मोठी कमाई करतो. (फोटो- Instagram/ Salman Khan)
-
‘बिग बॉस’ या भारतातील सर्वात मोठ्या रिअॅलिटी शोच्या सूत्रसंचालनासाठी तो प्रति सीझन २५० कोटी रुपये मानधन घेतो. (फोटो- Instagram/ Salman Khan)
-
सूत्रसंचालनाव्यतिरिक्त त्याने २०१९ मध्ये ‘द कपिल शर्मा शो’ आणि ‘नच बलिये ९’ यांसारख्या लोकप्रिय टीव्ही शोच्या निर्मितीही केली होती. यापूर्वी त्याने ‘१० का दम’ या शोचेही यशस्वी सूत्रसंचालन केले आहे. (फोटो- Instagram/ Salman Khan)
-
सलमान आपल्या कमाईचा एक मोठा हिस्सा सामाजिक कार्यासाठी वापरतो. २००७ मध्ये त्याने ‘बीइंग ह्युमन फाउंडेशन’ची स्थापना केली, जी गरीब मुलांचे आरोग्य आणि शिक्षणासाठी काम करते. (फोटो- Instagram/ Salman Khan)
GT vs RR: वैभव सूर्यवंशी डगआउटमध्ये एकटाच बसून रडू लागला! राजस्थानच्या पराभवानंतर भावुक करणारं दृश्य, VIDEO व्हायरल