-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने (Apurva Nemlekar) पती तनुज गोवळकरबरोबर (Tanuj Govalkar) एक खास नवं फोटोशूट केलं आहे.
-
या फोटोशूटसाठी अपूर्वाने पिवळ्या रंगाची अत्यंत सुंदर आणि आकर्षक साडी परिधान केली आहे.
-
तर, दुसरीकडे तनुजने राखाडी रंगाचा शर्ट आणि पॅण्ट परिधान करत अपूर्वाला परफेक्ट मॅच केलं आहे.
-
अपूर्वा आणि तनुजने एका नामांकित पुरस्कार सोहळ्यासाठी हा खास लूक केला होता.
-
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा जोरदार वर्षाव केला आहे.
-
१४ फेब्रुवारी २०२६ रोजी, म्हणजेच व्हॅलेंटाईन्स डेच्या मुहूर्तावर अपूर्वा आणि तनुज विवाहबंधनात अडकले आहेत.
-
हे नवविवाहित जोडपं सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून, त्यांचे रील व्हिडीओ नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात.
-
(सर्व फोटो सौजन्य : अपूर्वा नेमळेकर/इन्स्टाग्राम)
हिंजवडीतील आयटी कंपनी रातोरात बंद अन् शेकडो अभियंत्यांवर रस्त्यावर येण्याची वेळ